सखी मंद झाल्या
सखी मंद झाल्या
1 min
284
चाल: सखी मंद झाल्या
----------------------------------------
सखी थंड झाल्या चपात्या
आता तरी वाढशील का?
वाढशील का?
मधुर भाष्य करुनि तुज
विनवितो जोडून दोन्ही कर
ही भूक खूपच वाढली
तिला तू शांत करशील का?
करशील का?
तोंडाला सुटली लाळ अन
ओठात आहे ओढ ही
ती भूक शमविण्या
चपाती तू देशील का?
देशील का?
जे जे हवे ते सर्वही
दिसतसे समोरही
तरीही न वाढे पानात
तू पूर्तता करशील का?
करशील का?
बोलल्यावाचून मी
उपाशी जर राहिलो
थांबेल भूक क्षणभरी
पण सांग तू वाढशील का?
वाढशील का?