STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

साठी नंतर

साठी नंतर

1 min
519

जगण्याची खरी मजा

असते साठी नंतर

असते फारच थोडे

तरुण व म्हाताऱ्यात अंतर।।


असे तारुण्य व म्हातारपण

यांचा मधला सुवर्णकाळ

टेन्शन नसते काही

मजा असते तिन्ही त्रिकाळ।।


ना बालपणीचा गृहपाठ

नसे तारुण्याचा संघर्ष

ना चाळिशीतल्या कटकटी

प्रत्येक गोष्टीत मिळतसे हर्ष।।


नसे शाळेची घाई

न ऑफिसची किट किट

वेळेचे नसे बंधन

न ट्रॅफिकचा गोंगाट।।


नसे बस ची लाईन

नसे बाजार करण्यास हवा

सकाळी योगा प्राणा

दुपारी भरपूर जेवा।।


दिवसभर खुली हवा

सायंकाळी मित्रांबरोबर खिदळती

चहा पाण्याची मैफिल सजवा

राजकारणावर हवे ते बोलती।।


ना आई वडिलांच्या मार

ना बॉस ची फटकार

सुना मुलांना जीव लावी

खेळा नातवंडाशी सकाळ दुपार।।



Rate this content
Log in