STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

रूप ।

रूप ।

1 min
572

रूप तुझे मनोहर

गालावर तुझ्या खळी।

चंद्रकोर शोभे कुंकवाची

नाजूक तू चाफेकळी।।


नेसली तू पैठणी

जरतारी शोभतसे पदर।

कानात कर्णफुले

अन नाकात नथ सुंदर।।


माळला केसात गजरा

मोगऱ्याचा सुगंध दाटला।

सौंदर्याची खान तू

दिसतसे वैजयंतीमाला।।


तुझं ते गोड हसणं

मन झालं पुलकित।

गळ्यात मोत्यांच्या माळा

लक्ष होतसे विचलित।।


बिंदी शोभे दंडाला

कमरेला ग छल्ला।

पायात पैंजण वाजे

जीव तुझ्यावर जडला।।



Rate this content
Log in