STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

भेट तुझी माझी स्मरते

भेट तुझी माझी स्मरते

1 min
473

भेट तुझी माझी स्मरते

अजून त्या दिसाची

एस टी स्टँड नगरचे होते

गर्दीही होती बेताची।।


वेळ होती ती रात्रीची

नव्हता आकाशी एक ही तारा

आंधळ्या अंधारातून वाहे

हळुवार तो वारा।।

तुला होती जराशी भीती

जवळच्या लोकांची।।1।।

एस टी स्टँड नगरचे होते गर्दीही होती बेताची।।


केस कुरळे उडतसे

सावरण्या होता चाळा सुरू।

पहाण्या मन आतूरले

 धडपड माझी सुरू

धड धड ऐकू येत होती

तुझ्या त्या हृदयाची ।।2।।

एस टी स्टँड नगरचे होते गर्दीही होती बेताची।।


केसांवरती फुले होती

रक्तमा हा गाली

देखणे रूप तुझे पाहुनी

येई मला हसू गाली

एस टी लाही ओढ होती

आपल्या जाण्याची।।3।।

एस टी स्टँड नगरचे होते गर्दीही होती बेताची।।


आपल्याच त्या आना भाका

आपलाच तो श्वास

स्वप्नातही तुझे माझे

दिसतसे ते विश्व

एस टी लाही जाणीव झाली

तुझ्या माझ्या प्रेमाची ।।4।।

एस टी स्टँड नगरचे होते गर्दीही होती बेताची।



Rate this content
Log in