STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

शिक्षक

शिक्षक

1 min
383

विचित्र, विक्षिप्त ज्ञानी

त्या वेळचे शिक्षक थोर

वर्गात असा काही दबदबा

जणू काय होते मिनिस्टर।।


ऐकता आवाज त्यांचा

घाबरती सर्वजण खास

काय असेल मूड गुरुजींचा

न समजे कित्येकास।।


तुमची आमुची काय कथा

पाठ करावी लागते बाराखडी

विसरला असेल देव जरी

खाल्ली असती त्याने छडी।।


हातांत छडी दिसता

शांत होई वर्ग मुकाट

आवाज न कोणी करीती

हाताची घडी तोंडावर बोट।।


जरी असे वरवरी दुर्वास

मनामध्ये नसे त्यांच्या राग

शिक्षणासाठी कष्ट अपार

करुनिया सर्वस्वाचा त्याग।।


फार थोडे असे शिक्षक उरती

हल्ली सगळे लक्ष क्लासेसवरती

झाली दारुण अवस्था शिक्षणाची

अशा शिक्षणामुळे विद्यार्थी दबून जाती।।


Rate this content
Log in