STORYMIRROR

Ashok Kulkarni

Abstract

4  

Ashok Kulkarni

Abstract

ऋतू चक्र

ऋतू चक्र

1 min
486

तुच निर्मिशी तुच घडविशी

चंद्र सूर्य ताऱ्यांवर तुझीच सत्ता।

ऋतुचक्राचा हा खेळ चाले

न लागे कोणा थांगपत्ता।।


सुंदर नद्या नाले झुळुझुळू वाहती

वृक्ष वेली डौलाने डोलती।

फुलपाखरे त्यावर भिरभिरती

पाहूनी मोहक रूप सारे आनंदती।।


कधी सकाळी थंड गारवा

मध्यानीला जीव कासावीस।

सांजेला सोनेरी किरणांची चादर

चंद्र चांदण्याचा खेळ चाले रात्रीस।।


मंद लुकलुकणाऱ्या चांदण्या

अन असे निशब्द निशा।

वाहे स्वच्छ सुमंद गंध

होई निरानंद चारी दिशा।।


खेळ करीतसे भूवरी

ऊन पावसाचा वरचेवरी।

सृष्टीला न्हाऊ घालण्या

कोसळवितो पाऊस सरी।।


देतसे उमलत्या कळ्यांना

फुलण्याची आशा नवी।

हिरवा शालू नेसवूनी

वसुंधरेला तो सजवी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract