STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract

4  

शुभांगी कोतवाल

Abstract

Final stanzas of the year - वर्ष अखेरचे काही कडवे

Final stanzas of the year - वर्ष अखेरचे काही कडवे

2 mins
279


असावा एखादा इतका जिगरी मित्र वा मैत्रीण

न सांगता आपल्या मनातील विचार वाचणारे

शब्दापलिकडील भावना समजून घेणारी

कुठे काय सलतय कुठे काय दुखतयं हे 

समजण्याईतका जिव्हाळा आणि तितकी पक्की मैत्री असणारं 

किंवा मनातील अव्यक्त आनंद आणि समाधान अचूक टिपणारे

असे कुणी असावे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे


मन अशांत असता उगीच विचारपूस न करता

"आपण नंतर बोलू..." असं म्हणून आपलयाला एकटं राहायची संधी देणारं 

आणि मन शांत झाल्यावर मनसोक्त गप्पा मारायला हजर राहणारा 

कुठेतरी फेरफटका मारायला जाण्याचा हट्ट करणारा

आणि तेही तितकच जरुरी असतं हे पटवून देणारा

मोकळ्या हवेत गच्चीत बसून निवांत वेळ घालवायला साथ देणारं 


आपल्या प्रत्येक चुकांना माफ करून धीर देणारा

आपल्या प्रत्येक निर्णयाचा समर्थक आणि सहभाग देणारा

लागेल ती मदत करायला नेहमी हजर राहीन असं आश्वासन देणारा

प्रोत्साहन देणारा आणि आपल्या अर्तृत्वावर विश्वास असणारा

आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा


कुत्सित पणे काही न बोलता किंवा चुका न काढता

आपल्या गुणांना ओळखून त्याची दखल घेणारा 

मनात कुठलही कपट किंवा द्वेष न बाळगणारा

ज्याला आपली ओळख पटली आहे 

ज्याच्यावर आपण पूर्णत्वाने विश्वास टाकू शकतो

न घाबरता न खचकता मनातील विचार सांगू शकतो


जरुरी नाही त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे

पण एक प्रामाणिक निखळ निस्वार्थी अशी 

मैत्री सुध्दा पुरेशी आणि खूप जरुरी असते

आपल्याला खऱ्या खोट्याची जाणीव करून देणारं 

 कुणीतरी नक्कीच नितांत आवश्यक असतं 

खरा सल्ला देणारा आपलं चांगलच चींतणारा

असा कुणीतरी एक मित्र वा मैत्रीण जरूर असावी 


जगातील फसव्या आणि स्वार्थी लोकांपासून आपल्याला दूर ठेवणारा

आणि हे जगणं सोपं व आनंददायी करणारा

वेळीस खरी मैत्री निभावणारा आणि जीवन सुखकर करणारा

ज्याच्या मैत्रीवर आणि प्रामाणिकतेवर आपल्याला गर्व होईल असा

आपल्या नशिबावर अभिमान वाटावा असा

खरच! असा कुणीतरी जिव्हाळ्याचा आपुलकीचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जरूर असावी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract