आभाळ
आभाळ
आभाळ इतकं उंच आणि विशाल का असतं?
आभाळा इतकी उंची गाठण्याची प्रेरणा देणारं
नजर जाईल तिथवर पसरलेले अती विशाल
सर्वांना छत आणि छप्पर देणारं आभाळ
त्यापेक्षा उंच काहीच असू शकत नाही
तसेच समुद्र इतका अथाग पसरलेला असतो
जिथ वर नजर जाईल तिथवर पाणीच पाणी
विशाल तट असलेला ज्याची काही सीमा नाही
देशाच्या सीमारेखा ही त्याला अडवू शकत नाही
कोणाचाही त्यावर एकाधिकार असू शकत नाही
तसेच पर्वत शिखरं जसे हिमालय एव्हरेस्ट
ज्याची उंची आणि शिखरं इतकी विलक्षण
आणि बर्फाच्छादित सौंदर्याने परिपूर्ण
त्यावर चढायचं म्हणजे तारेवरची कसरत
अनेक अडी अडचणींवर मात करून
कुणीतरी एखादा ते शिखर गाठू शकतो
कदाचित माणसाला गर्व होवू नये
आपणच बलवान आहोत असा भ्रम होवू नये
त्याने आपल्या सीमा ओलांडू नये
ह्यासाठी ह्या सर्व गोष्टी पुरेशा आहेत
निसर्गाची बरोबरी कोणी करूच शकत नाही
अनेक मौल्यवान वस्तूंचा खजाना आहे निसर्ग
जितकं श्रीमंत कोणी असूच शकत नाही
हिरे मोती सोनं चांदी आणि अनेक धातू
संगमरवरी दगड आणि अनेक रंगी खडक
हवा पाणी ऊर्जा जमीन अनेक घटक
वृक्ष जंगल नदी झरे पक्षी प्राणी
धान्य फळे फुले औषधी वनस्पती
निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही पूर्णत्व असलेली
ज्याचा कोणीही मुकाबला करूच शकत नाही
जणू आपल्याला त्याचं श्रेष्ठत्व पटवून देणारी
आपल्याला नतमस्तक करून टाकणारी ही सृष्टी
आपल्याला भरभरून बरेच काही देणारी
विलक्षण अद्भुत चकित करून टाकणारा
जितकं आपण पाहू शकतो कल्पना करू शकतो
त्याच्याही पलीकडे असलेला अनेक पटींनी अधिक
निरनिराळ्या आश्चर्याने भरपूर असा हा निसर्ग
ज्ञान आणि विज्ञानाच्या ही पुढे असलेले अनेक प्रकार
जिथे माणसाची कल्पनाशक्ती सुध्दा कमी पडावी
आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी अशा अनेक
वस्तू , शक्ती आणि सौंदर्य व आश्चर्याने परिपूर्ण
आपल्याला आणखीन काहीतरी नवीन करायला
प्रेरित करणारा असा हा विलक्षण निसर्ग
जणू आपणावर आभाळा इतकी माया करणारा
आणि म्हणूनच इतक्या उंचीवर असणारे आभाळ!
