STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

4  

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

मायबोली

मायबोली

1 min
40

माझी मराठी भाषा 

    माझा अभिमान 

सुंदर तिचे अलंकार 

   आणि तशीच शब्दावली

तिने घडविले महान कवी

   लेखक आणि कलावंत

दिली जगाला ओळख पटवून

    "अभिजात" भाषा म्हणून

ती साक्षी आहे इतिहासाची

   वर्तमान आणि भविष्याची

जसा भाषेत गोडवा

  तशीच तल्लख आणि धरारी 

दिले महान विचारवंत 

   आणि पू. ल सारखे मार्मिक 

पण सहज असे विनोदवीर

  काही अमराठी साहित्यिक 

रचले कितीतरी इतिहास

 अशी ही मराठी मायबोली

ती जितकी प्रखर आहे

   तितकीच ती मृदुही 

जपुया आपला शब्द संचय

  म्हणी वाक्प्रचार आणि 

व्याकरण व उच्चार

मराठी भाषेत रचले गेले

  अभंग व संतवाणी

पोवाडे व विविध साहित्य 

  जे झाले अजरामर 

धरूया मनी गर्व

 आपल्या ह्या मराठी भाषेचा

बोलत राहू लिहीत राहू

 आणि वाचत राहू मराठी भाषा

करूया आपले कर्तव्य निर्वाहन 

   देवून हा ठेवा पुढच्या पिढीस

असावा मनी अभिमान

  मराठी मातृभाषेचा 

आणि असावा गौरव

आपल्या ह्या सुंदर महान

 मराठी भाषेचा .

मराठी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

























   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract