~साथ ~
~साथ ~
साथ , जोडीदार , आधार , सोबती आणि
हाच तर निसर्गाचा नियम आणि कालचक्र
निसर्गाला हिरवळीची साथ
रात्रीच्या काळोखाला काजव्यांची साथ
चंद्रप्रकाशाला शितलतेची साथ
वाळवंटात रखरखत्या उन्हाची साथ
सूर्याला तेजोमय प्रकाशाची साथ
रात्रीला रातकिड्यांचा आवाजाची साथ
एकमेकांशिवाय सर्वच जणू अधुरे
नदीच्या पाण्याचा खळखळाट आणि संथ प्रवाह
नदीच्या किनाऱ्याला उंच खडकांची साथ
समुद्राला उंच उठणाऱ्या लाटांची साथ
फुलांना सुगंधाची साथ
पहाटेला पक्ष्यांच्या आवाजाची साथ
वृक्षांना सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याची साथ
घनदाट जंगलांना प्राण्यांची साथ
प्रत्येक साथ जणू एक ओळख
आणि एकमेकांशिवाय अधुरी
जिथे साथ अविभाज्य बनून जाते
मंदिराला घंटीच्या नादाची साथ
कीर्तनात टाळ - चीपळीचा साथ
विद्येला विनयाची साथ असावी
विज्ञानाला कुतूहल वृत्तीची साथ
संशोधनाला चिकाटीची साथ
पंगतीला रांगोळीची साथ
भात -- वरणाला साजूक तुपाची साथ
हळदीला कुंकवाची साथ
सौंदर्याला बुद्धिमत्तेची साथ
बालपणात निरागसतेची साथ
अभ्यासात पुस्तकाची साथ
मैत्रीला मौजमजा करण्यासाठी साथ
साथ जी नैसर्गिक असुदे अथवा
स्वनिर्मित कृत्रिम तरीही पूरक अशी
एका शिवाय दुसऱ्याची कल्पना अशक्य
अशी ही अस्तित्वाची सांगड घातली आहे
ज्यात गरज आणि सुंदरता ही आहे
