पुष्पगुच्छ
पुष्पगुच्छ
लहान - मोठे कितीतरी रंग आणि छटा असणारे
असे हे फुलांचे विश्व जणू देवाची किमयाच
निरनिराळी नावं लाभलेले ते विविध पुष्प
उपयोगिता आणि पौराणिक महत्त्व असलेले
सुंदरतेचे धनी आणि सुगंधाने भरपूर
मनाला प्रसन्नता देणारे आश्चर्यचकीत करणारे
अगणित अनंत आणि नावीन्य असणारे
पाहूया काय - काय दडलंय ह्या प्रत्येक फुलात ???
लाल चटक रंग असलेली गणेश व लक्ष्मीला प्रिय
अशी पूर्णपणे उमलणारी हसरी जास्वंद
गुलाबी , पांढरा , पिवळा असे अनेक रंग
सुवास नसणारी तरीही मनाला आनंद देणारी
चांदणी हे नावाप्रमाणेच हिरव्या पानांवर चमकणारे
पांढरे शुभ्र आकाशातील चांदण्यांचा आकार असणारे
हिरव्या देठाचे अतिशय सुंदर असे हे फुल
गोकर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकाराचे
निळ्या पांढरा अशा रंगात आढळणारे
शंकराचे प्रिय बारीक हिरव्या पानाच्या वेलावर लागणारे
पारिजातक हे नावाप्रमाणेच सुंदर असणारे
पिवळसर पांढरा रंग आणि शेंदरी देठ असणारे
अतिशय सुवासिक आणि पहाटे उमलणारे
आणि गळून जमिनीवर सडा पाडणारे
जाई - जुई ची तर बातच निराळी
नाजूक सुवासिक पांढरी शुभ्र
देवाला तर अतिशय प्रिय आणि
स्त्रियांच्या वेणीवर शोभणारे
सर्वत्र आपला गोड सुगंध पसरविणारे
रातराणी ही नावाप्रमाणेच राणी
वातावरण अगदी दरवळून टाकणारी
अतिशय सुंदर आणि मनमोहक सुगंधित
रात्री उमलून वाऱ्याबरोबर डोलणारी
गुलाब हा फुलांचा राजाच म्हणा
अगणित पाकळ्या असणारा
विविध रंगात आढळणारा
सर्वांनाच खूप प्रिय असणारा
मानवी भावना व्यक्त करणारा
गुलबाक्षी , सदाफुली ही सुवास नसणारी
पण बिनचूक उगणारी नेहमी फुलणारी
झेंडू ची पिवळी धमक फुले सजावट व
देवा साठी हार अन देवळात अर्पण केली जाणारी
शेवंती , डहलिया , सूर्यफुल हे आकाराने मोठे
जणू नेहमी हासरा चेहरा असणारे
मोगरा जरी पांढरा आणि साधा
पण सुगंधाने भरपूर , सर्व फुलांना मागे टाकणारा
अगदी ओंजळीत घेवून तो सुगंध साठवून ठेवावासा वाटणारा
कमळ तर विष्णूला अती प्रिय असलेले
माती चिखल आणि भरपूर पाण्यात उगवणारे
लांब दांडीचे अनेक उपयोगी असलेले
उमलून हवे बरोबर उभ्या - उभ्या डोलणारे
गणेशालही प्रिय असलेले सुंदर असे ते कमळ
बटणाच्या आकाराचे अतिशय सुवासिक
अशी ती बकुळफुले सुकल्यावरही सुवास टिकणारे
झाडाखाली बसून वेचावे लागणारे तरी
स्त्रियांसाठी प्रिय असलेले मोठाले गजरे करून केसात माळले जाणारे
निशिगंध हे पुष्पगच्छ यात नेहमी असणारे
उंच दांडीचे मधुर सवासिक भरपूर कळ्या असणारे
चाफा अती प्राचीन काळापासून असणारे
पांढरा पिवळा तर चक्क सोन चाफा
अगदी सोन्यासारखा लख्ख पिवळा सोनेरी चाफा
उन्हाळ्यात आढळणारा गुलमोहर
तर पावसाळी पाण्यामुळे फुलणारी लीली
अशी अगणिक नावीन्यपूर्ण फुले
निसर्ग सौंदर्य वाढवणारी मनाला प्रफुल्लित करणारी
निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगीच !
