आयुष्य कसे जगावे
आयुष्य कसे जगावे
जीवन हे भरभरून जगण्यासाठी असते
नुसता विचार करून वेळ घालण्यासाठी नसते
कर्तव्य करत राहणे ते ही न चुकता न विसरता
नाहीतर आपलं मन आपल्याला खात राहते
जसं परीक्षेसाठी योग्य तयारी आणि कष्ट घेतले
तर आपल्याला परिणामाची फिकर नसते
तसेच आपण आपला कामाचा वाटा उचलून
एकचित्ताने , हुशारीने , प्रामाणिकपणे
जर काम केले तर कोणी आपलं बिघडवू शकत नाही
ह्या सगळ्या कर्तव्य आणि कामाव्यतिरिक्त
जीवन जगणे , स्वतःसाठी वेळ देणे हेही
जीवनात तितकेच महत्त्वाचे आणि जरुरी असते
थोडा बदल , थोडी विश्रांती हेही तितकंच जरुरी असते
थोडी मस्ती थोडा फेरबदल जरुरी असतो
कधी मित्रांसोबत सहलीला जाणे तर कधी
कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवणे
तर कधी आपल्यातला मी शोधण्यासाठी
चिंतन , मनन , वाचन , एकांत ही तितकाच जरुरी
स्वतःच्या प्रगतीसाठी नवीन काहीतरी करणं
काहीतरी शिकून ते आत्मसात करणं
हाही जीवन जगण्याचाच एक भाग असतो
सतत प्रवृत्ती करत राहणे प्रगती करत राहणे
जीवनात पुढे जायला नेहमी सज्ज राहणे
काहीतरी वेगळे करण्याची चिकाटी असणे
आणि थोडी बेफिकीर वृत्ती सुद्धा जरुरी असते
लोकं काय म्हणतील आणि काय म्हणतात
तिथे दुर्लक्ष करून आपले मन दृढ असणे
आपल्याला काय साधायचे आहे
आपले लक्ष्य काय आहे हे विसरून चालत नसते
आत्मविश्वास , चिकाटी आणि उत्साह कमी होता कामा नये
नाहीतर आपले शत्रू आणि भय सतवायला लागते
स्वतः वरचा विश्वास डळमळू देता कामा नये
कोणाला आपल्यावर हावी होवू देता कामा नये
समाजाशी नेहमी जोडले राहावे दुरून तरी
परोपकार केल्याने आत्मसंतोस मिळत असेल
समाधान मिळतं असेल ते दान करत राहावे
आपल्या संस्कारांशी जोडले राहावे ते विसरून जाता कामा नये
कधी मोकळा वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यात जरूर राहावे
शांतता आणि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी
खळखळ वाहणाऱ्या नदीचा प्रवाह असो
एखादा शुद्ध पाण्याचा झरा वा धबधबा असो
आणि कुठून तरी हळुवार ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट असो
थंडगार वाहणाऱ्या हवेची झुळूक असो
सगळं कसं मनाला प्रसन्न करून जातं
प्रवास आणि नवीन ओळखी खूप काही शिकवून जातात
एकाच चाकोरीत राहून न जगता जितकं काही ह्या जगापासून घेता येईल ते घेत राहावे
माणूस स्वभाव आणि त्यातले काही दोष जसे की इर्षा द्वेष राग अबोला क्रोध ह्याला कोणीही अपवाद नसतो
त्यावर संयम ठेवणे ते टाळणे हे आपण नक्की करू शकतो
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देत राहावे
आपल्याकडून जे दुसऱ्यांना दिले जाईल
त्यातून आपल्यालाही आनंद होईल
असं काहीतरी नवीन काहीतरी अनपेक्षित
जे कुणाला सुखावून जाईल तसं करत जावे
जीवन हे मोकळेपणाने आणि उदार तेने जगावे
भरभरून जगावे सुखाने आनंदाने जगावे!
