निसर्ग
निसर्ग
झाडे वेली फुल पाखरे
या सगळ्यांची पंगत बसली
पहाटेच्या प्रभात मुहूर्ती
निर्जिव टेकडी गोड हसली
कडाक्याची थंडी पडली
तृणा वरती दवं अंथरले
दरी बनली विशाल दर्पण
इंद्रधनूचे रंग पसरले
धबधब्याची गंमत भारी
झरझर झरती पाट दूधाचे
फुलचुख्यांनी गर्दी केली
मधू जमविले अन्न उद्याचे
रवी किरणांचे रंग अनोखे
सृष्टी नेसली पिवळा शालू
सुरू झाले रहाट गाडगे
चाक लागले आहट काढू
आकाशाने पिंजला कापूस
त्यामध्ये काळे मेघ भरले
निसर्गाची किमया न्यारी
जड जीव हे विश्व अवतरले