STORYMIRROR

Dipaali Pralhad

Abstract Romance

4  

Dipaali Pralhad

Abstract Romance

स्तब्ध झंकार

स्तब्ध झंकार

1 min
416

हाक माझी आज मलाच आली 

येऊनी परत ओठातच शांत झाली 

श्वास विरला क्षणात स्तब्ध झंकार हाक झाली 


ना शब्दांनाही पाझर फुटला ,

ना मला तो थांब म्हटला , 

ना मी ही वळूनी पाहिले

ना शब्द ओठी फुटले 


फिरत्या पाठी जरी मी चालले 

हृदयात काहूर वादळं माजले 

ना मोजत्या वेदनेच्या भावना 

तुझ्या चेहऱ्यावर का मला दिसल्या 


स्वप्नांचा गाव तू निखळ माझा 

माझाच गाव रडला मिठीत माझ्या 

परी ना आसवे ना शब्द इतका 

दुष्काळ कोरडा काहूर आकांत 

मनात माझ्या क्षणक्षणाला जगला 

©


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract