STORYMIRROR

Dipaali Pralhad

Others

3  

Dipaali Pralhad

Others

तुझी वाट बघता बघता

तुझी वाट बघता बघता

1 min
396

तुझी वाट बघता बघता 

दिस मावळला सांज ल्याली 

पहाऱ्यावर पहार गेला 

अन दिसाची रात झाली 


तुझ्या येण्याची ना चाहुल 

येत्या वाटेवर उभा जिथं मी ,

ऊगाच उभा असा धावता ,

सैरावैरा पळून काळजाची 

काहुर घालमेल मात्र  


सांजची चढत चढत रात होते 

पण तुझ्या येण्याची काही खबर नाही 

मन बावरे संग पाऊलही धजत नाही 

घरट्याच्या परतीच्या वाटेवर 

मन इथं काही रमत नाही 


नाही माहित का कुणास ठाऊक 

मी नुसताच असा निःशब्द उभा 

एकाकी शोधतो तुझ्या पाऊलखुणा 


असा येतो नकळत मंद वारा 

का हळूच येते ओठी गीत तुझे 

झुळूक स्पर्श धुंद आसमंत न्यारा 


अशीच तुझी वाट बघता बघता 

दिस मावळला सांज ल्याली 



Rate this content
Log in