STORYMIRROR

Sarika Musale

Abstract

4  

Sarika Musale

Abstract

परी

परी

1 min
332

आमची आहेस तू छकुली

दिसते कशी गोड बाहुली

कोप-यात का बसलीस अशी

रुसू नको ग माझी सोनुली


रागाने झाले लाल नाक

काय झालं ते तरी सांग

अबोला असा धरु नको

रुसून असं बसू नको


बाबांनी आणली आवडती पेस्ट्री

दादाने दिली सिल्कची कॕटबरी

आता तरी बोल ना ग राणी

आजीनेही आणला फ्राॕक तुला भारी


आता आलं लक्षात माझ्या

सासरी पाठवीन म्हटले मी तुला

तू तर माझी आवडती प्रिया

माझ्यापासून दूर कशी करेन तुला


जगाची आहे रीतच न्यारी

आत्ताच तुला समजायचे नाही

हसं बरं सोनु आता रुसवा सोड

साॕरी बाळा असं म्हणणार नाही


हसली माझी ती सोनकळी

आहे ती आमची सुंदर परी

गालावर तिच्या खुलली कळी

पदराआड कशी लपली लाजरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract