शिवरायांचे आदर्श चरित्र
शिवरायांचे आदर्श चरित्र


एक युग होते एक युग होते
जेव्हा शिवरायांचा जय जय कार होता
तलवार त्यांच्या पराक्रमाची धार होती
मनात आदर्श स्वराज्याची कल्पना होती
शिवरायांचा तो बळीराजा सुख समृद्द होता
दुष्काळात तो मायेच्या सावलीत जगात होता
तेव्हाच्या माता भगिनी निर्भीड पने जगात होत्या
शिवरायांचा तो युवक रयतेसाठी झटत होता
तेव्हाची माउली संतांची शिकवण देत होती
बाप तेव्हा लेकराला राष्ट्रहिताचे धडे देत होता
तेव्हा एक कवी म्
हणून आली जबाबदारी
सांगीन मी समाजाला शिवरायांचे आदर्श चरित्र
जे जगाला आजही सांगत आहे कसे असावे जनमानसाचे स्वराज्य
तेव्हा युवकांनो तुमीच घ्या हातात स्वराज्याची ज्वलंत मशाल
घ्या जबाबदारी तुम्ही आपल्या थोर माऊलीच्या सेवेची
आपल्यावर संस्कार करणाऱ्या बापाच्या कष्टाच्या मोलाची
तेव्हा शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा
तेव्हा असाच आशीर्वाद राहू दे माझ्या कवी मनी
एक नाही तर लक्ष लक्ष काव्य घडू दे माझ्या हातुनी !