STORYMIRROR

Amol Mandhare

Others

4  

Amol Mandhare

Others

बालपण

बालपण

1 min
353

अशे हे आमचे बालपण निराळेच बर का 

जुन महिन्यात मामाच्या गावाला जायचो 

आणि मे महिन्यात विहिरीत डुंबत बसायचो 

शाळेत जाताना इस्त्री केलेली हाफ पॅन्ट घालायचो 

आणि दिवसभर पुस्तकाकडे नाही तर घड्याळात बघायचो 


परीक्षेच्या वेळेला तर माझी मज्जाच असायची 

चार उत्तरे मनातली चार उत्तरे पुढील बाकावरली 

आणि दोन उत्तरे खिशातली नाही तर अशीच असायची 

शनिवारी भेळ पुरी खात बसायचो, आणि रविवारी शेजारची कोंबडी पकडत बसायचो 


शाळेचा होमवर्क करायला चॉकलेट ची लाच घायचो 

आणि कळत नसतानाही डिस्कव्हरी चॅनेल बगत बसायचो 

वाटायचे आज ऋत्विक ची स्टाईल मारायची 

पण तेवढ्यात परीक्षेची तारीखच जवळ यायची 

आम्ही पुस्तकाकडे आणि बाई आमच्याकडे तशा वाकड्या नजरेनेच बघायचे 


आणि वर्गाच्या बाहेर नेहमी आंगठे धरूनच उभे राहायचे 

बाईची केलेली टिंगल मनाला टोचत होती 

पण त्यांची शाबासकीची थाप बरेच काही बोलून जात होती 

अशे हे आमचे बालपण निराळेच बर का                     


Rate this content
Log in