माझा शेतकरी
माझा शेतकरी
1 min
296
हे बळीराजा काय सांगू तुला या घडीला
तू शेतात राबतेस ऊन पावसात
तेव्हाच मिळते अन्न आमच्या या भुकेल्या दुनियेस
तू करतोस कष्ट अपार, करतोस सहन दुष्काळाचे सावट
पण तोंडून नाही तुझ्या कधी कसली तक्रार
शेती मालाला तुझ्या मिळो ना मिळो भाव
पण या नियतीच्या बाजारात तूच श्रेष्ठ तूच अनमोल
उभे पीक जेव्हा डौलते तुझ्या शेतात
तोच तुझ्यासाठी जणू दसरा आणि दिवाळीच
