आई थोर तुझे उपकार
आई थोर तुझे उपकार


या कलियुगात जगात आपल्या
मी आईच्या कुशीत झालो मोठा
लोभ नाही स्वार्थ नाही
तर फक्त मायेने हाथ माझ्यावर फिरवला
शाळेत जायच्या आधी बोटाला धरून शिकवले
कित्येक दिवस रात्र जागून मला शांत झोपवले
दोघा भावंडांना समान वागणूक दिली
प्रेमाबरोबर रक्तात शिस्तही घडवली
अभ्य्साबरोबर संतांची शिकवणूक हि दिली
स्वतः बरोबरच परमार्थाची महतीही पटवली
जगात सर्व जण स्वार्थासाठी जगतात
पण फक्त कुटुंबाची काळजी घेते माझी माउली
>जशी दिली शिवरायांना शिकवणूक आदर्श स्वराज्याची
तशीच दिली मलाही ओळख परोपकाराची
तेव्हा घ्या जबाबदारी युवकांनो तुम्ही आपल्या थोर माऊलीच्या सेवेची
कणभर का होईना पण करा परत फेड त्या उपकाराची
आई तुझी अशीच कृपा राहू दे माझ्यावरी
झालो असेन मी आज मोठा पण नाही विसरून चालणार तुझीच माया
झालो मी कवी तुझ्याच मायेने आज वर्तमानात
पण अजून घडतील आशीर्वादाने तुझ्या
एक नाही तर लक्ष लक्ष काव्य घडतील माझ्या हातुनी