सुरुवात पावसाची
सुरुवात पावसाची
सर्व ऋतुं वर भारी पडणारा असा हा पाऊस
कधी येतो अचानक आणि होते सगळ्यांची धावपळ
तर कधी देतो येण्याची चाहूल शहण्यासारखा
पसरतो काळोख अन गडगडाट होतो ढगांचा
तेव्हढ्यात वाळत घातलेले कपडे घरात आणायची लगबग
तर बाहेर पडलेले भरभर पाऊल उचलून गाठतात घर
लहान मुलांची होते गंमत बाहेर पावसात खेळायची
पाऊस थांबल्यावर साठलेल्या पाण्यात कुदून येते मज्जा पाणी उडवण्याची
तर सर्दी होईल म्हणून काहींना राहावे लागते घरातच
पावसाची कविता गाणी म्हणून लहान मुले होतात आनंदी
काहींना खूप आवडणारा असा हा पाऊस तर काहींना येतो पावसाचा तिटकारा
पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी
पेरणी करून जो बसलेला असतो आभाळाकडे टक लावून
ज्याला होतो सर्वात जास्त आनंद पहिल्या पावसाने
रखरखत्या उन्हापासून देतो पाऊस सर्वाँना सुटकारा
पाणी आहे सर्वांसाठीच अती आवश्यक
कमी पाणी आणि करावी लागणारी काटकसर
यापासून सर्वांनाच मिळते मोठी राहत
वाळलेल्या नद्या तलाव पुन्हा दिसतात ओले
नवीन रोपं लावणे कुठून झाडाची फांदी मागून आणून
आपल्या बागेत लावण्याची वेळ येते बागायत करणाऱ्यांसाठी
कुठे बियांचे रोप तयार होते तर काही झाडांना नवीन पालवी फुटते
रोपं सुद्धा भरपूर पाणी मिळाल्याने डोलू लागतात
नवनवीन रंगीत आणि सुवासित फुले नवीन फळे
भरभरून यायला सुरुवात होते सर्वदूर हिरवळ पसरते
झाडांवर पानांवर साठलेली धूळ धुवून निघून
रंग उजळून जाऊन होतात ती ताजीतवानी
सुकत आलेल्या झाडांना फुटते नवीन पालवी
पक्षी सुध्धा साजरा करतात आनंद साठलेल्या पाण्यात फुदकुन
काही करतात आपले आंग मोकळे पंख उडवून
मोर सुद्धा आनंदित होवून नाचू लागतात पिसारा फुलवून
पावसाची सुरुवात करून जाते सर्वांनाच आनंदी!
