STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

3  

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

प्रवाह

प्रवाह

2 mins
14

 

सुगंध सुवास हा न दिसणारा न धरता येणारा

कोणी त्याला लपवू शकत नाही किंवा अडवू शकत नाही

रातराणी, मोगरा जाई जुई निशिगंध मधुमालती

शेवंती चाफा पारिजातक अशी अनेक सुवसित फुले

जी बहरली की सर्वदूर सुवास पसरतो 


वाराही अदृश्य कधी न दिसणारा तरीही सगळीकडे अस्तित्व असणारा

किती उपयोगी आणि किती आवश्यक!

रखरखत्या उन्हात अंगाला स्पर्श करून 

मनाला सुखावून जाणारा , गरमीची तीव्रता कमी करणारा

सर्व जीवांना प्राणवायू पुरवणारा

त्याला धरून ठेवणे कठीणच नाही तर अशक्य


पाणी ज्याला काही रंग नाही आकार नाही

पण जीवनोपयोगी अती आवश्यक प्रवाही

स्वतःचा रस्ता व जागा स्वतःच करून घेते 

नदी समुद्र झरे धबधबे आणि त्यांचे उद्गम स्थान

जिथून ते सर्व अडथळे पार करून सर्वदूर पसरतात

कधी संथ तर कधी खळखळणारे पाणी आणि 

कधी उंच उठणाऱ्या लाटांच्या रुपात

आणि आकाशातून पावसाच्या रुपात बरसणारे!


तसेच सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता 

ह्याला कोणी अडवूच शकणार नाही

जे पूर्ण पृथ्वीला प्रभावित करते 

सूर्योदय उजेड तेज ऊर्जा घेवून येते 

तर चंद्रोदय अंधुक प्रकाश शीतलता आणि शांतता घेवून येते.


सर्व अदृश्य आणि प्रवाही सर्वदूर पसरणारे

निसर्गातील महत्वाचे घटक प्रवाही का असावे?

तर ते सर्वांसाठी आहेत सर्वांना आवश्यक आहेत

दैवी शक्तीचा एक महत्वाचा भाग आहेत 

त्याला सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाही असणे भाग आहे 

कुठे अडकून अडथळून किंवा थांबून चालणार नाही!

विश्रांतीसाठी उसंत नाही आणि एक स्थिर जागा नाही

ज्याच्याकडे भेदभाव नाही कोणी कमी - जास्त नाही

जे बिकाऊ नाही आणि ज्यावर कोणाचा मालकीहक्क नाही


आणि म्हणूनच प्रवाह बरेच काही शिकवून जातो

नेहमी काळाच्या प्रवाहाबरोबर चालत राहावे

जो सतातोद्योगी आणि कर्म करणारा आहे

त्याला अडचणी येतात अडथळे येतात 

पण ते पार करून फक्त पुढे जात राहावे

हा आपलाही गुणधर्म असेल तर 

स्वतःची प्रगती साधून दुसर्यांच्याही

उपयोगी पडत राहणे हे आपले सर्वांचे 

जीवन जगण्याचे लक्ष्य असेल तर आपण कधीही थांबणार नाही!


रंग रुप आकार हे फक्त बाह्य स्वरूप असते

जसं सुगंध वारा पाणी ह्यांचा गुणधर्म प्रवाही असणे

त्याचा आंतर मनाशी कर्माशी काही सरळ संबंध नाही!

तसेच ज्याला कीर्ती हवी असेल 

विशाल उपयोगिता आणि कार्यक्षेत्र हवे असेल

त्याने प्रवाहाचा मार्ग गुणधर्म अनुसरला पाहिजे!

मानवी मन व आत्मा हे ही न दिसणारे 

शरीराशी मन आणि आत्म्याची सांगड घालून

कर्म करत राहिलो तर प्रवाह प्रमाणे माणसालाही काहीही असाध्य नाही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract