STORYMIRROR

Aasavari Ainapure

Abstract

3  

Aasavari Ainapure

Abstract

एका गुरुची महती

एका गुरुची महती

1 min
245

एका गुरुची महती

किती वर्णावी ती थोर

गुरु असे पाठीराखा

नसे जीवा कधी घोर


गुरु मांडतो विचार

गुरु देतो ज्ञानामृत

कक्षा ओलांडून जीवनाच्या

नवा देतो दृष्टिकोन


गुरु दाखवी वाट

गुरु घडवी जीवन

गुरु सानिध्यात जेव्हा

गळे माझे 'मी' पण


गुरु शिष्यांचा सांगाती

गुरु सामान्यांचा सोबती

तरी गुरु एक सेवेकरी

म्हणे स्वतःस सेवाव्रती


गुरु ज्ञानाचा प्रकाश

गुरु सत्संगाचा उपदेश

गुरु संवाद अजोड

गुरु सद्विचारांचा अवकाश


करावी गुरुभक्ती अपरंपार

न मानावे कुणा सान-थोर

गुरु सानिध्यात व्हावे

अवघे जीवन साकार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract