बालपण
बालपण
बालपणाचे रम्य दिवस
करतात घर काळजात
व्यापतात कोपरा मनाचा
जागवतात आठवणी मनात
बालपणाचे रम्य दिवस
हुतूतू,लंगडी अन् कबड्डी
कधी डबा ऐसपैस
कधी लांब अन् उंच उडी
बालपणाचे रम्य दिवस
थोडी मजा, थोडी शिस्त
कधी असतो डाव रडीचा
तरीही असते प्रयत्नांची शिकस्त
बालपणाचे रम्य दिवस
संतुलन अभ्यास अन् खेळाचे
दंगा-मस्ती, श्लोक, परवचा
बालपण संस्कारक्षम वयाचे
बालपण असे हे प्रत्येकाचे
प्रत्येकाने अनुभवावे समरसून
व्हावा जिवंत प्रत्येक क्षण
जगावे बालपण पुन्हा मनापासून......
