अंधाराची शाळा
अंधाराची शाळा
1 min
333
अंधाराच्या शाळेत
जमले चंद्र नि तारे
शिक्षकांच्या जोडीस
होते ढग नि वारे।।
मज्जा आहे ताऱ्यांची
फक्त रात्रीच शाळा
सूर्य जसा उगवेल
अंधार सरतो काळा।।
शोभली आकाशगंगा
शिक्षिका ती जशी
खुर्चीवर तिच्या
होती ढगांची उशी।।
शाळा ताऱ्यांची
आहे फार मस्त
काळ्या पाटीची
किंमत तेथे स्वस्त।।
ना गणिताचे कोडे
ना मराठीच्या गोष्टी
तारे शाळेत शिकतात
रात्री चमकवायला सृष्टी।।