मला नदी व्हायचंय
मला नदी व्हायचंय
1 min
571
मला नदी व्हायचंय
सतत खळखळ वाहणारी
दगड धोंडे काट्या कुट्याना सामावून घेणारी
होय! मला नदीच व्हायचंय ।।
दरीकपारीतून मला वाट काढायचीय
मोठ्या मोठ्या पर्वतावरून उडी मारायचीय
समस्त जीवांची तहान शमवायचीय
होय! मला नदी व्हायचंय।
कृष्णा,कोयना पंचगंगा अशी नामावली हवीय
बाळ गोपाळाना माझ्या संथ पाण्यात खेळवायचंय
आम्रतरुंना ,फुलवेलींना माझ्या काठावर सजवायचयं
होय ! मला नदी व्हायचंय.।।
अशी मी वाहत जाणारी नदी
एक दिवस मला थांबायचंय
सागराच्या महाबाहुत
स्वतःलाच हरवून जायचंय
होय! मला नदी व्हायचंय!