FEW HOURS LEFT! Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
FEW HOURS LEFT! Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Rucha Rucha

Others


2  

Rucha Rucha

Others


येऊ दे मला

येऊ दे मला

1 min 219 1 min 219

आई सांग ना ग 

का येऊ देत नाहीस मला?

हसती खेळती अल्लड परी

नकोशी झालीय का ग तुला?


आई अग ,पाहू दे ना मला

इतकं सुंदर, छान जग

तुझ्या आयुष्यातही रंगीत क्षण

मी नक्कीच घेऊन येईन बघ!


आई अग, येऊ दे ना ग मला

हवी आहेत मला सारीच नाती

पण ,माझ्या येण्याने का ग

सारेच तोंड फिरवती?


आई अग, येऊ दे ना मला

आहेच ग मी कुळाची पणती

फक्त परक्याच धन म्हणून 

का ग मला सारे हिणवती?Rate this content
Log in