चाफ्याच्या फुला
चाफ्याच्या फुला
चाफ्याच्या फुला, चाफ्याच्या फुला
जरा ऐकून घे ना माझी खंत
नको असा हिरमुसून पाहुस
नको ना पाहुस माझ्या जीवाचा अंत
चाफ्याच्या फुला, चाफ्याच्या फुला
ऐकून घे ना माझी थोडी कहाणी
लपवशील का रे तुझ्या पाकळ्यात
माझ्या डोळ्यातील दाटलेले पाणी
चाफ्याच्या फुला, चाफ्याच्या फुला
कशी काय रे लोकं एवढी स्वार्थी?
सुख वाटून घेतात एकत्र, पण
दुःखात सारेच पाठ फिरवती!
चाफ्याच्या फुला, चाफ्याच्या फुला
न बोलता तू माझ्याशी खूप बोलतोस
मंद झुळकेमध्ये गंधावणारा तू
माझा खरा हितचिंतक भासतोस!