शोकांतिका
शोकांतिका


ज्यावेळेस होतो जन्म तुझा
सर्वांचे चेहरे हिरमुसतात
परक्याचं धन म्हणून तिचं
स्वागत करणंही विसरतात
वंशाला दिवाच हवा असतो
म्हणुनी करतात उपवास
नकोच असतो घरच्यांनाही
अंगणी मुलींचा सहवास
नाईलाजाने शिकवतात तिला
मोठंदेखील करतात
शेवटी, रांधा, वाढा, उष्टी काढा
यातच तिला गुरफुटवतात
असशील तू वकील-डॉक्टर
तुझा धर्म हाच आहे "संसार"
जन्मापासून ते मरेपर्यंत
स्त्रीच असते ना लाचार!!!