आयुष्याचा प्रवास
आयुष्याचा प्रवास
1 min
749
आयुष्याच्या प्रवासात
सारे आपण प्रवासी
स्वप्नांच्या खिडकीने
जुळतो आपण नभाशी।।
आयुष्याच्या प्रवासात
अनेक रस्त्यांचा काळ
वाटे वाटे वर गुंफते
नव्या नात्यांची माळ।।
आयुष्याचा प्रवास
भासे जसे सप्तसूर
विविध सुरांनी सजलेले
वाटे ते गीत मधुर।।
आयुष्याचा प्रवास
सुरु होई उदरातून
सुखदुःखाचे आयुष्य
मुक्ती मातीत मिळून।।