अरे बाप्पा जरा लवकर ये
अरे बाप्पा जरा लवकर ये
1 min
380
अरे बाप्पा जरा लवकर ये
शाळेचा कंटाळा आलाय
पटकन सुट्टी मिळवून दे।
अरे बाप्पा जरा लवकर ये
थोडासा तुझ्या हातातील
मोदक मलाही चाखू दे।
अरे बाप्पा जरा लवकर ये
माझा थोडासा गृहपाठ
तूच मला करून दे।
अरे बाप्पा जरा लवकर ये
तुझ्या उंदीर मामाला
जवळून मला पाहू दे।
