पाहतो तुला क्षणोक्षणी
पाहतो तुला क्षणोक्षणी
पाहतो तुला क्षणोक्षणी
विरघळतो मी तुझ्यात अलगद
एकरूप होती संवेदना अपुल्या
प्रेम भावना मनात रुजते गडद
मोहक हे रूप तुझे
साठवतो मी क्षणोक्षणी
मनात खोलवर रुतुनि जरी
नकळत व्यक्त होतेस नयनी
होतो जीव वेडापिसा
तुझ्या एका कटाक्षाने
नयनांची ही भाषा बोलते
मनातले गुज अधीरतेने
जपतो मी हा संवाद कायम
तोच असतो ठेवा आयुष्याचा
तुझ्या असण्यानेच भवताल
झळाळून उठतो अंतरीचा...

