मनातल्या आसवांनी
मनातल्या आसवांनी
मनातल्या आसवांनी
व्हावे मनाजवळ व्यक्त
सलणार्या कढालाही
करावे एकदा आश्वस्त
सलणारा कढ तो
बिलगेल हळूच मनाला
आसवांचे नाते तयाशी
कथिल तो मनाला
हळूहळू होईल मुक्त
स्वतःच्याच कोषातून
आसवांच्या साथीनेच
वाहील तो मनातून
मन होईल मोकळे मोकळे
गाईल आसवांचे एक गीत
आसवां आभाळ ठेंगणे
कढ एक मात्र मनमित......
