प्रेमाचा कबुली जबाब
प्रेमाचा कबुली जबाब
प्रेमाचा कबुली जबाब
दिलास जेव्हा तू मला
जाहलो मी बेधुंद अन
बेधुंद एक क्षण जाहला
तुझ्या होकारात होता
अर्थ प्रेमाचा गवसलेला
प्रेमाच्या चांदण्यासाठी होता
एक चकोर आसुसलेला
वाट किती पहावी मनाने
तुझ्या प्रेम भरल्या होकाराची
कबुलीजबाबाने प्रेमाच्या
निवविली चंचलता या मनाची
सूर जुळले, ताल जुळला
जुळली प्रेमाची सुरेल तार
नाद उमटला धुंद प्रेमाचा
घुमला अस्मानी प्रेमाचा झंकार
गाठ ही साता जन्माची
एका अजोड क्षणाने बांधली
अन प्रीत ही जन्मोजन्मीची
आज मनामनात बहरली....

