माझ्या मराठीचे कौतुक
माझ्या मराठीचे कौतुक
माझ्या मराठीचे कौतुक
कुणी वर्णावे ते किती
भाषा रसाळ गोमटी
जणू सौंदर्याची रती
माझी मराठी अव्वल
कधी शहरी कधी गावरान
गोडवा तिचा अमर्याद
करी घायाळ सकल
आरस्पानी रूप तिचे
शब्द महिमा काय वर्णू
संतांची ही भाषा ऐसी
सकलांची माय जणू
संवादाची भाषा ही
अर्थास झळाळी देते कायम
व्याकरणाचे होता आकलन
सुसंवाद होतो सहज, सुगम
वळणदार ही भाषा मराठी
करू गौरव आज तिचा
समृद्ध अशा भाषेचा
वारसा जपूया आज पुन्हा
