रंग जीवनाचा
रंग जीवनाचा
रंग जीवनाचा
उमलून आज आला
सखे तुझ्यामुळे मज
अर्थ आयुष्याचा कळाला
होते वैराण माझे
आयुष्य एकले हे
तुज संगतीने नव्याने
तो श्वास मी जाणियेला
आली संकटे कितीही
खात्री तुझ्याच सोबतीची
दोघांच्या प्रवासाचा
हा मार्ग मी रेखीयला
होतो अजाण मीही
होते अजाण आयुष्य हे
तुझ्या येण्यानेच जीवनी
पारिजात नव्याने बहरला
आहे विविधरंगी हे
आयुष्य आपुले आता
तुझ्याच सहवासाचा
गंध जीवनी दरवळला

