ती एक सबला.....
ती एक सबला.....
ती एका सबला
ती एक नारी
ती ध्येयपूर्ती
ती जिद्द सारी
ती अवघे विश्व
ती जगत जननी
ती आदिमाया
ती जीवनदायीनी
ती नारीशक्ती
ती वात्सल्य मूर्ती
ती कलोपासक
ती एक निर्माती
ती धाडसाचे नाव
ती संयमाचे प्रतीक
ती निर्णय क्षमता
ती दुष्टांची संहारक
ती कोमल भाव
ती कठोर ताठर
ती एक निर्भया
ती बिनधास्त निडर
ती एक कौशल्य
ती एक निपुणता
ती प्रयोगशील
ती एक अस्मिता
ती घराचे घरपण
ती एक अस्तित्व
चराचरात व्यापलेले
अमूर्त नारीतत्व
नारीतत्त्वाचा सन्मान या
सारे मिळून करू आज
तुमच्या माझ्यातल्या 'ती'ला
मनापासून वंदू आज
