कशासाठी?......…
कशासाठी?......…
कशासाठी मनातल्या मनात कुढत राहायचं?
आपलंच दुःख सतत उगाळत राहायचं?
सुखामागून दुःख हे येणारच
सावलीबरोबर ऊन हे असणारचं
कशासाठी उन्हाने एवढं त्रासून जायचं?
सावली सोबत असताना उगाच ग्रासून जायचं?
सकाळचा सूर्य संध्याकाळी मावळतो
थकलेला जीव घरट्याकडे परततो
कशासाठी सांजवेळी कातर व्हायचं?
मनातल्या कढानं चिंतातूर व्हायचं?
झालचं दुःख तर करा त्याला मोकळं
भावनांनाही मिळू दे अवकाश सगळं
कशासाठी भावनांनी झिजून जायचं?
मनातल्या मनात थिजून जायचं?
सृष्टीकडे बघितल्यावर विचार तुमचा बदलेल
निसर्गाच्या सानिध्यात नवा दृष्टिकोन रुजेल
कशासाठी जुन्यालाच परत परत कुरवाळायचं?
आपल्याच दुःखाचं गाणं आपल्यासाठी आळवायचं?
