मनाच्या तळाशी
मनाच्या तळाशी
मनाच्या तळाशी तो थांबलेला
असा एक पाऊस मी साठवलेला
किती हे बहाणे किती हे इशारे
किती आठवावे तुझे रूप सारे
तुझा मखमली स्पर्श, मृदगंध ल्यायलेला
तुझ्या चाहुलीने जीव नादावलेला
तुझ्या अंतरीचे आज मजला कळावे
किती पाहावी वाट, तू हलकेच बरसावे
तुझा एक थेंब नी, वणवा विझावा
जीवाचा तुझ्याशी एक संवाद घडावा
अधिरता मनाची तुला पाहण्याची
चिंब मनाने तुला भेटण्याची
अलगद अवचित तू कवेत यावास
तुझा एकेक थेंब मी मनी साठवावा....
