STORYMIRROR

Ashok Kulkarni

Abstract

4  

Ashok Kulkarni

Abstract

गोजिरी

गोजिरी

1 min
440

सुंदर कोमल हसरी लाजरी

आहे माझी परी गोजिरी।

धावत येऊनि बिलगे अंगाला

दुडूदुडू करीत बोबडे बोलते परी।।


हसत खिदळत नाचे घरभर

कुठे लपुन बसेल नेम नसे।

पाहुनी तिचे बालिश चाळे

तिजबरोबर रमून जातसे।।


रडून ओरडून कांगावा करी

आपले म्हणणे करते खरे।

तिचा तो गोजिरवाना चेहेरा

आनंदाला पारावर न उरे।।


कधी टाकीती हळूच पाऊले

भासे मजला आकाशातील परी

डोळ्यात साठवून ठेवतो

भासे जणू स्वप्नसुंदरी।।


चैन न पडे जीवाला या

जरी झाली क्षणभर नजरेआड।

हसत असते सारे घर

जेंव्हा करी चाळे द्वाड।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract