Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Kulkarni

Others

3  

Ashok Kulkarni

Others

जिल्हा आमुचा अहमदनगर

जिल्हा आमुचा अहमदनगर

1 min
438


सन 1490 मध्ये केली स्थापना

अहमद निजामाने भिंगार भूमीवर

अंमल निजामशाही राजवंशाचा

नाव पडले असे त्याचे अहमदनगर।।


उपभोगिली जरी सत्ता पेशवे मराठ्यांनी

घेतला ताबा या भूमीवर शेवटी इंग्रजांनी

वापरी भूईकोट किल्ल्याला तुरुंग म्हणोनी

कित्येक सत्याग्रही कोंडिले या ठिकाणी।।


जवळच असे दुसरा सलाबतखानची कबर

म्हणती चांदबिबीचा महाल असे शहा डोंगरावर

तीन मजली अष्टकोनी इमारत असे सुंदर

अहंमदनगरच्या वैभवात पडली असे भर।।


दमडी मशीद, बाग रोजा, बारा इमाम कोट

फरीया बाग पॅलेस, चर्च, किल्ला भूईकोट

ऐतिहासिक संग्रहालय कॅन्टोन्मेंट रेजिमेंट

वैभव व कीर्ती नगरची वाढली अफाट।।


जिल्हा असे सर्वांत मोठा महाराष्ट्रात

उंच कळसुबाईचे शिखर या जिल्ह्यात

जवळच असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ

नाणे परत करणारा हरिश्चंद्रगड अद्भूत।।


झहीर खान अन् अजिंक्य रहाणे क्रिकेटर

प्रमोद कांबळे असे मूर्तीकार अन् चित्रकार

शाहू मोडक अन् सदाशिव अमरापूरकर

दिले जिल्ह्याने आम्हाला, किर्तीत पडली भर।।


राळेगण सिद्धी पर्यावरण संवर्धक

सिद्धटेकचा असे सिद्धीविनायक

हिवरे गाव असे आदर्श जिल्ह्यात

विशाल गणपती आनंदे वसे नगरात।।


आनंदऋषीजी अन् महान संत मेहेरबाबा

जगी असे गवगवा ते शिर्डीचे साईबाबा

ज्ञानेश्वरांनी महती वाढविली या भूवरी

केली अमर रचना लिहिली ज्ञानेश्वरी।।


Rate this content
Log in