गरीब गरिबी
गरीब गरिबी
1 min
341
करी रोटी रोटी
भटके दारोदार
भुकेने हैराण
क्लेश त्याला फार।।
पडे पाऊस जोरात
वा कडक पडे ऊन
वहात असतो तो
ओझे वाकून।।
आपल्या गरिबीवर
रडतांना पाहिलंय
चार तुकडे भाकरीचे
वाटून खातांना पाहिलंय।।
कुठलं औषध
नुसता दुवा करी
उतरतो ताप,
होतात दुखणी बरी।।
जोरदार पाऊस
कोसळताना
पाहिली आहे
झोपडी पडतांना।।
पोटाची भूक हीच
त्यांची आपत्ती
व्याकुळ होऊन
भुकेने मरती।।
नसती काही
इच्छा आकांशा मनी
तोडीती दम
व्याकुळ होऊनी।।
