STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

बेटी

बेटी

1 min
483

बेटी

--------


जेंव्हा झाली बेटी शहाणी

विसरून गेली ,कधी होती ती राणी।।


चुकवीत नजरा जाई बाजारात

पाणी पाणी होतसे हृदयात।।


जायचं तुला दुसऱ्या घरी

तू न आता मनमानी करी


भावास प्रेमाने चॉकलेट देई

स्वतः मात्र गुडदानी खाई।।


हळद मेहंदी लावून, बांगड्या भरून

केले सर्वांसमक्ष कन्यादान ।।


दुसऱ्या घराला आपलं मानायचं

आयुष्यभर माहेर शोधायचं।।


चूल मुल झाडू धुणं बरतन

विसरून जायचं आता माहेरपण।।


मनात मारी इच्छांना जीवनभर

सासरलाच ती माने आता माहेर।।


Rate this content
Log in