STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

3  

Ashok Kulkarni

Others

उखडून फेकू

उखडून फेकू

1 min
232

जरी श्वास थांबला

धडपासून डोके झाले वेगळे।

आम्ही आता नाही डगमगणार

आम्ही न्यायासाठी भुकेले।।


रक्ताने माखून जाऊ

छातीवर गोळ्या झेलू।

आला अंगावर धाऊन कोणी

जमिनीत त्याला घालू।।


धरती मातेच्या रक्षणा

पदर करू शरीराचा।

आहे आमच्यात दम

रक्षण करण्या मातेचा।।


ते करतात हल्ले छुपे

आम्ही छाती ठोकून केले हल्ले।

त्यांचाच भाषेत त्यांना

चोख उत्तर दिले।।


कुठपर्यंत सहन करायचे

नाही गप्प बसवत।

आता नाही होणार बरदास

उखडून फेकू त्यांना गगनात।।


Rate this content
Log in