STORYMIRROR

Stifan Khawdiya

Abstract Inspirational

4  

Stifan Khawdiya

Abstract Inspirational

ओढा.....

ओढा.....

1 min
916

तळ्याच्या सांड्यातुन

झाला उगम फेसाळ

वाट वनावनातुन

उफळुण खळखळ


वळण वळण घेता

जल धारेत निर्मळ

वहातो खळखळुणी

कसं जल झुळझुळ


वहातो शिवारातुन

विहिरीला आंदण

बांधाच्या पलिकडे

पाणवठ्याचे ठिकाण


गाव वेशीच्या जवळ

धोबी घाट त्याच्यावर

बायामानसांची गर्दी

घुणं न्हानं डोहावर


चिमुकले करे मस्ती

शिवनापाणी जलात 

खुळी मासुळीचा खेळ

चाले ओढ्याच्या धारेत


ओढा वाहे तिथे संथ

स्मशान जिथे एकांत

झाडाझुडतुन वाहे

धार ओढ्याची वेगात


गावगावातून वाहे

वरदान निसर्गाच

जाउन भेटे शेवटी

नाव ओढ्याला नदिच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract