STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

स्वातंत्र्यमुक्त छंद कविता.

स्वातंत्र्यमुक्त छंद कविता.

1 min
158

सुशिक्षित असुन हि असुशिक्षित वागणाऱ्या बेजबाबदार कुळात जन्माला आली होती.

रुढी परंपरा या पेक्षा स्त्री लिंग ह्या ईश्वरी देणगीला

ती प्रचंड बळी पडली होती.

गर्भात असताना तिला गर्भात खुडण्याचा प्रयत्न केला होता.

पण नशिबच तिचं 

मृत्यूच्या वाटचालीतुन कळत नकळत सोळा वर्षांचा काळ तिने पार केला होता.

जगणं तसं तिचं बेभरवशी होतं

तरी रोज नव्या उमेदीने जगायची

एकदा तरी उंच भरारी घेईल, त्या उमेदीना जनु

स्वातंत्र्याचे पंख द्यायची.

काळा नुसार घडत गेली 

जे नशिबात होत ते स्विकारत गेली

एक दिवस..........

ते जबाबदारीतून मोकळे झाले होते

अन् ति नव्या बंधनात नव्याने अडकली गेली

क्षण,मिनिटे,तास,दिवस,आठवडे, महिने, वर्ष

सुखदुःखाच्या वाटाखाटित बदलतं होते

मात्र ती तशीच होती

दबावाखाली गुरफटलेली 

स्वातंत्र्याचे पंख दुमडुन त्याग करणारी त्यागीनी

एक दिवस असा आला मातृत्व लाभले तिला

स्त्रीलिंगातचं....

आता जगणं अवघड झालं असं वाटलं तिला 

एकटक बाळाकडे पहातां विचारांच्या वादळात हरवली थोड्या वेळासाठी अगदी स्तब्ध झाली

अन् अचानक गालत हसुन म्हणाली

मी आहे तुझ्यासोबत सदैव तुझी सावली होऊन

तुला बळकट पंख देऊन जिवनाच्या आकाशात उंच भरारी घ्यायला

बोलता बोलता नकळत तिचे डोळे भरून आले होते.

थोड्यावेळ स्तब्ध राहून जनू

तिच्या भूतकाळाशी सामना केला होता.

अन् नव्या आवेशात 

 तिच्या उमेदिना तिने स्वातंत्र्याचे पंख देऊन उंच भरारी घेतली होती..

समोर उभ्या असलेल्या सौभाग्याकडे भरलेल्या नजरेने पहात होतो.

का? कशासाठी 

तिच्या पहाण्यात जणू ती समाज, रुढी परंपरा,लिंगभेद याचा सामना करत होती...

अगदी स्वातंत्र्याने...


Rate this content
Log in