नवा संकल्प
नवा संकल्प
1 min
171
जीवनाच्या वाटेवर
क्षण ना क्षण भोगला
बावन्न आठवड्यांचा
कालावधी मावळला..
मानव निर्मित क्रम
नव वर्ष संबोधले
आनंदाचे क्षण क्षण
पुन्हा जीवनी लाभले..
सरलेले एक वर्ष
आठवणीत साठले
अनुभवाचे गाठोडे
जगण्यासाठी बांधले..
दिवस तो साधारण
वैशिष्ट्यपूर्ण ठरला
जीवन घडामोडींचा
संकल्प नवीन केला..
नको माघार जीवनी
पंख लेउ स्वातंत्र्याचे
उचं भरारी जीवनी
घडू अस्तित्व स्वताचे..
जपू या माणुसकीला
एकतेचा वसा धरु
गुण संपन्न सर्वत्र
सुंदर भारत करु..
एकतेच्या मार्गावर
विसरून जातपात
नववर्ष आगमन
हर्षाने करु स्वागत..
