STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

करतो का प्रण

करतो का प्रण

1 min
20


ठेवशील का व्रत तिच्या साठी दिवसभराचा 

जन्मो जन्मी हिच अर्धांगनी लाभो 

विनवशील का देवाला.

साता जन्मातच काय भेटना-या प्रत्येक जन्मात

तिच साथीला हवी

लावतो का कौलं देवाला.

सौभाग्यच लेन तु तिच्यासाठी 

म्हणून तिनं का सारा त्याग करावा 

अन् तुझं वागण त्या चंद्रा सारखं 

ती पौर्णिमा संपताचं हळुहळु 

आमावस्या पर्यंत अंधकारात जान 

मग तिनं हसत हसत 

सार दु:ख सहन करावं 

स्व:ताच अस्तित्व त्यागुन 

आनंदाने घरकुलाचा वृक्ष सांभाळावा 

त्या वृक्षाच संगोपन करावं 

नात्याचे पानं फुलं फळ तीन जपावं 

येनारे प्रत्येक उन्हाळे पावसाळे हिवाळे 

मग तिला त्रास झाला तरी चालेल 

तिनं ते आनंदाने सहन करावं

कारण तशी हि मायभूमी पुरुष प्रधान आहे ना

तिला दु:ख त्रास होतो 

यांची कणभर जाणिव कुणालाही नसते 

ती फक्त त्याची पत्नी असते फक्त पत्नी

त्यांच्या जीवनाच कामकाज पहाणारी 

एक साधारण स्त्री म्हणजे पत्नी 

बदलतो का रे हि रुढी परंपरा 

वेळ आली तर लढशीलं का यमा बरोबर

करशील का रे खरचं असं

कारण हि दुनिया उलटी आहे

तीच्या बाजूनी लढणं दुरच 

पण तिच्यावर अत्याचार नक्कीचं

करशील ना रक्षा तिची पदोपदी 

तु असं केलं ना तर तिचा उपास फाळास येईल 

अन् तिला कोणत्याही पौर्णिमेची 

गरज लागणार नाही

कारण तिचा सत्यवान नेहमीच 

तिच्या पाठीशी असणार 

अन् तिच्या साठी तिचा चंद्र नेहमीच 

पौर्णिमेत असणार फक्त पौर्णिमेतचं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन