नकळत त्याला मृत्यू भिडला
नकळत त्याला मृत्यू भिडला
ओढ लागली त्याच्या देहाला
झाला मोह कसा मनाला
सुंदर वळणा वरती
सैराट होता भर ज्वानीत
रुपात गोडवा तरुण देखना
हट्टाकट्टा गडी चार चौघात
नादात त्या भ्रमात जगला
झाला मोह कसा मनाला
अजान होता बर्या वाईटाशी
शक्तीच्या जोरावर भन्नाट गडी
खेळ वाटे बिध्दास्त मजा मस्ती
नकळत घसरली जिवनाची गाडी
वाट ती वाकडी चालायला
झाला मोह कसा मनाला
नजरेच्या इशार्याला कसा भुलला
सौंदर्याच्या थेंबांत चिंब भिजला
वाटे त्याला सर्व सुख भ्रमंती
याच भुलव्यात फक्का फसला
न राहीले भान कशाचे त्याला
झाला मोह कसा मनाला
तरुण रक्त सळसळुन उठलं
मर्दांगीच्या वावटळात उंच उडल
वाटे चार बोट आकाश कमी
इथचं त्याला सार नडल
पान विडा जिवनाचा रंगला
झाला मोह कसा मनाला
वेळ सरली काळ लोटला
वासनेचा प्याला पितचं राहिला
हरएक रात्र नवा प्याला
नकळत त्याला मृत्यृ भिडला
रोग आता गुपित जडला
झाला मोह कसा मनाला
न जानलं मोल कधी जिवनाचं
सार कसं क्षणातचं मावळलं
माज केला तारुण्याच्या उंबरठ्यात
एडस् च्या आंधारात जिवन हरवलं
मुकला आता जिवनाला
झाला मोह कसा मनाला
बे वारिस चिता जळाली
नको तिथ छि थु झाली
क्षणात संपल अस्तित्व
स्व:मर्जिनं हि वेळ ओढावली
शरण गेला मृत्यृला
झाला मोह कसा मनाला
