STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

दिन गुलाबी थंडीचे

दिन गुलाबी थंडीचे

1 min
111

मंद मंद शित वायू

दिन गुलाबी थंडीचे 

कवी मनाला भुरळ 

दव शिंपतो शब्दांचे 


ऋतू शब्दांत मांडला

केला खुलासा थंडीचा

उधळून शब्दमोती 

झाला उदय काव्याचा 


धुंद कसा गारव्यात 

झाले नवल देहात

झाली किमया अजब

झाला बदल मनात


शब्द शब्द जुळवणी

विन जणू ती बंडीची

विचारांच्या शेकोटीत 

उब मिळते ज्वालेची


गारव्यात होते कधी

भावनेची घालमेल

गोड अनुभव सारे

शित क्षण ते अमोल 


ओढ लागली देहाला 

शित स्पर्श हवाहवा 

रम्य जीवन घटिका 

जन्म वाटे नवा नवा 


हरएक क्षण कैद

साठा विपुल मनात  

व्यक्त होतो मुक्तपणे 

आज गुलाबी थंडीत 



Rate this content
Log in